7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो भारतीय पोलीस दलात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे.

मित्रांनो खरं पाहता भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र संवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेश भत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा गृह विभागाचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पारित झाला आहे. सदर निर्णयामुळे महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांना गणवेश भत्त्यामध्ये सुधारणा होणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण गृह विभागाचा पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्ता बाबत जारी झालेला सुधारित शासन निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गृह विभागाने 27 ऑक्टोबर 2022 रोजी सदर शासन निर्णय निर्गमित केला आहे.

27 ऑक्टोबर 2022 रोजी गृह विभागाकडून जारी झालेला सुधारित शासन निर्णय खालील प्रमाणे :- 

महाराष्ट्र संवर्गामध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांच्या गणवेश भत्त्याबाबतचा खर्च सदरचे अधिकारी २०५५, पोलीस या मुख्यलेखाशिर्षा अंतर्गत कार्यरत असलेल्या ज्या गौण लेखाशिर्ष (मायनर हेड) व उपशिर्ष (सब हेड) घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत त्या गौण व उपशिर्षाखालील पोलीस घटक कार्यालयास ०१ वेतन 39 या तपशिलवार शिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

त्यासाठी संबंधित त्या विभागातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलीस सेवेतील जे अधिकारी इतर विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असतील त्यांनी त्या विभागाच्या / कार्यालयाच्या वेतन व भत्ते यासाठीच्या तरतुदीतुन सदरचा खर्च अदा करावा.” निश्चितच भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्रात वर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही एक कामाची बातमी आहे. गणवेश भत्ता संदर्भात जारी झालेला हा सुधारित शासन निर्णय त्यांच्यासाठी अतिशय कामाचा आहे