7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात एक मोठ अपडेट हाती आल आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा देत महागाई भत्ता मध्ये वाढ केली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल चार टक्के वाढ करण्यात आली आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. निश्चितच केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फायदा होत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याची किंवा सध्याच्या सातव्या वेतन आयोगात मूलभूत बदल करत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यासंदर्भात हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दाव्यानुसार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केली जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ होणार असल्याचे सदर मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतन ठरवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.

अशा परिस्थितीत आता फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट प्रमाणे फिटमेंट फॅक्टरचा लाभ दिला जात आहे. दरम्यान आता या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर आता 2.57 पट वरून वाढून 3.68 पट एवढी वाढ होणार आहे. मित्रांनो खरं पाहता फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यासाठी कामगार युनियन कडून वारंवार सरकारकडे मागणी केली जात आहे. कामगार युनियन फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी वेळोवेळी निवेदन देखील देत आहेत.

यामुळे सरकारवर दबाव बनत असून लवकरच ट्रीटमेंट फॅक्टर वाहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात किती वाढ होऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा सविस्तर पण थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट एवढा फिटमेंट फॅक्टरचा लाभ आहे.

यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपये एवढा मूळ वेतन मिळतं तर राज्य कर्मचाऱ्यांना 18 हजार रुपये एवढं मूळ वेतन दिल जात आहे. आता फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास आणि फिटमेंट फॅक्टर 3.68 पट एवढ झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतन हे 18 हजारावरून 21000 आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 21,000 वरून 26000 होणार आहे.

मित्रांनो फीटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वाहन भत्ता इत्यादी भत्यात देखील वाढ होत असते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या पर्वावर राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक सुखद निर्णय शासनाकडून घेतला जाणार असल्याची बतावणी सुरू आहे. निश्चितच सदर मीडिया रिपोर्टमध्ये केलेला दावा खरा ठरला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.