मुंबई : साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर NTR यांचा RRR चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसने पहिल्याच दिवशी सर्वांना हादरवून सोडले. मात्र, आता या चित्रपटाच्या 7व्या दिवशी तर कमाईच्या आकड्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. फक्त एकाच आठवड्यात चित्रपटाने सर्वाना हादरून सोडले आहे.

माहितीनुसार, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने बंपर कमाई करत अवघ्या 7 दिवसांत 700 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 710 कोटींची कमाई केली आहे.यासोबतच दिग्दर्शक राजामौली यांचा RRR हा चित्रपट त्यांच्या मागील ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 च्या स्पर्धेत उभा आहे.

हिंदी बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट उत्तर भारतातही कमाल करत आहे. या चित्रपटाने एकट्या हिंदी बॉक्स ऑफिसवर एकूण 132 कोटींची कमाई केली आहे, गेल्या 7 दिवसात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जोडली आहे. इतकेच नाही तर, यासोबतच, दिग्दर्शक राजामौलीचा हा चित्रपट सूर्यवंशी यांना मागे टाकत कोरोना कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. तर तेलगू भाषिक राज्यांमध्ये या चित्रपटाने 279 कोटींची कमाई केली आहे.