5G Technology : (5G Technology) देशात नुकतीच 5G टेक्नोलॉजी सुरु झाली असून, याचा लवकरत लवकरत विस्तार व्हावा यासाठी एकूण 100 लॅब उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती आईटी आणि टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwin Vaishnav) यांनी दिली आहे.

5G: IT आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार देशात 5G तंत्रज्ञानासाठी (5G Technology) 100 प्रयोगशाळा (5G Lab) स्थापन करण्याची योजना आखत आहे. यापैकी किमान 12 लॅब विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि प्रयोगासाठी वापरण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्र्यांनी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी कंपन्यांना नवीन दूरसंचार विधेयकावर आपले मत देण्याचे आवाहन केले. या विधेयकाच्या माध्यमातून परवाना प्रणाली सुलभ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

देशात 5G तंत्रज्ञानासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याची सरकारची योजना – अश्विनी वैष्णव

आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwin Vaishnav) म्हणाले, “आम्ही देशभरात 100 5G लॅब स्थापन करणार आहोत. दूरसंचार उद्योगाशी हातमिळवणी करण्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे. आणि या 100 लॅबपैकी किमान 12 लॅब विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी तयार करायच्या आहेत.

उद्योगमंत्री पियुष गोयल यांनीही आनंद व्यक्त केला

ते म्हणाले, “सरकार सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी परवाना प्रणाली सुलभ करण्यासाठी जोमाने काम करत आहे. स्टार्टअप्स आणि एमएसएमईची ऊर्जा पाहून मला खरोखर आनंद झाला आहे जे लोकांच्या फायद्यासाठी ग्रामीण भागात जात आहेत.” वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देखील इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सांगितले की 5G ची ओळख केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी एक निश्चित क्षण आहे.

5G सेवा कधी मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G मोबाइल सेवा सुरू केली आहे. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मार्च 2023 पर्यंत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होईल.