5G : आज देशात 5G (5G )सेवा सुरु झाली आहे. मात्र आजही इंटरनेटच्या बाबतीत भारत खूप मागे आहे. शहराकडे इंटरनेटची सेवा उत्तमरित्या मिळते मात्र गावाकडे (Village) आजही इंटरनेटची सेवा व्यवस्थित पोहचत नाही.
पंतप्रधान मोदींनी(Narendra Modi) आज दिल्लीतील प्रगती मैदानावर 5G इंटरनेट सेवेची औपचारिक घोषणा केली. आता भारत 5G सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत आणखी एक पाऊल टाकणार आहे. मात्र, देशात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. रिलायन्स जिओ दिवाळीच्या मुहूर्तावर 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. यानंतर देशात अधिकृतपणे 5G सेवा सुरू होईल.
भारत टॉप-10 देशांमध्येही नाही
जर आपण इंटरनेट स्पीडबद्दल (Speed) बोललो तर सौदी अरेबियामध्ये सर्वात वेगवान इंटरनेट प्रदान केले जात आहे. OpenSignal च्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियामध्ये मोबाईल यूजर्सना 414.2 Mbps चा डाउनलोड स्पीड मिळतो. म्हणजेच वेगाच्या बाबतीत सौदी अरेबिया अव्वल आहे.
सौदी अरेबिया – 414.2 Mbps
दक्षिण कोरिया – 312.7 Mbps
ऑस्ट्रेलिया – 215.7 Mbps
तैवान – 210.2 Mbps
कॅनडा – 178.1 Mbps
स्वित्झर्लंड – 150.7 Mbps
हाँगकाँग – 142.8 Mbps
युनायटेड किंगडम – 133.5 Mbps
जर्मनी – 102.0 Mbps
नेदरलँड आणि अमेरिका – 79.2 Mbps
भारतातील गाझियाबाद जिल्ह्यात 50.9 Mbps चा डाउनलोड स्पीड (Speed) उपलब्ध आहे. जर आपण संपूर्ण देशाबद्दल बोललो तर, फिक्स्ड ब्रॉडबँड कनेक्शनवरून वापरकर्त्यांना सरासरी 30 ते 35 एमबीपीएस दरम्यान स्पीड मिळतो.
5G भारतातील खेड्यापाड्यात कधी पोहोचेल?
Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने देशाच्या कानाकोपऱ्यात 5G (5G )इंटरनेट पसरवण्याची तयारी केली आहे. जिओने देशातील प्रत्येक गावात 5G इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा केली आहे. तथापि, ते अजूनही दूरचे मानले जाते. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते ही सेवा गावोगावी पोहोचण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. त्याचवेळी मोबाईल कंपन्या असाही दावा करत आहेत की ते डिसेंबर २०२३ पर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा पोहोचवतील.