अंगावर सांडली गरम कॉफी वृद्ध महिलेला द्यावे लागले २४ कोटी
त्यानंतर महिलेने रेस्टॉरंटविरोधात न्यायालयात खटला दाखल करीत रेस्टॉरंटकडून ३ मिलियन डॉलर्सची मागणी केली. त्यावर आता रेस्टॉरंटकडून महिलेला २४ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत.
एका वृद्ध महिलेच्या अंगावर चुकून कॉफी सांडल्याने संबंधित रेस्टॉरंटला पीडितेला नुकसानभरपाई म्हणून कोट्यवधी रुपये द्यावे लागले. हे प्रकरण जॉर्जिया येथील असून जिथे डोनट आणि कॉफीच्या एका रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली.
त्यानंतर महिलेने रेस्टॉरंटविरोधात न्यायालयात खटला दाखल करीत रेस्टॉरंटकडून ३ मिलियन डॉलर्सची मागणी केली. त्यावर आता रेस्टॉरंटकडून महिलेला २४ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहेत.
जॉर्जिया येथील एका रेस्टॉरंटमध्ये २०२१ मध्ये एका वृद्ध महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडली. या घटनेत महिला इतकी गंभीर जखमी झाली की, तिला पुन्हा चालणे शिकावे लागले आणि आजही तिला दैनंदिन कामे करताना वेदना होत आहेत.
तिच्या जखमा इतक्या वेदनादायक होत्या की, तो हॉस्पिटलच्या बनं युनिटमध्ये कित्येक आठवडे राहिली आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले, तिला चालताना अजूनही वेदना होतात, तिला उन्हात उभे राहता येत नाही.
कर्मचाऱ्याने महिलेला कॉफी दिल्यानंतर कॉफी कपचे झाकण उघडेच ठेवले, त्यामुळे तिच्या अंगावर कॉफी सांडली. या घटनेत गंभीररीत्या भाजली गेल्याने महिलेला उपचार घेताना १.६६ कोटींपेक्षा जास्त खर्च आला.
कर्मचाऱ्याने कॉफीच्या कपवर योग्यप्रकारे झाकण ठेवले असते, तर हा अपघात झाला नसता, असे महिलेने दाखल केलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले. अखेर रेस्टॉरंटनेही या गोष्टीला सहमती दर्शवली असून संबंधित रेस्टॉरंट कंपनीने महिलेला २४ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.
बीजिंग: चीनच्या हुनान प्रांतातील झांगजियाजी येथील तियानमेन माऊंटन नॅशनल पार्कमध्ये एक पर्वत आहे. ज्याला स्वर्गाचे द्वार असे म्हटले जाते. कारण त्याला ‘देवी’ प्रवेशद्वार समजण्यात येते. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना ९९९ पायऱ्या चढाव्या लागतात. तेथील विलोभनीय दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही परतावेसे वाटत नाही. अप्रतिम दृश्य आणि अनोखी रचना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात.