RAMIJ RAJA
"16 crore player to you ..."; Former India cricketer shows Ramiz Raja a mirror

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) हा कायमच भारताशी आणि BCCI शी स्पर्धा करत असतो. भारतात IPL च्या घवघवीत यशानंतर PCB ने पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू केलं. मात्र, PSL आयपीएल अजूनही टक्कर देऊ शकली नाही. अशास्थितीत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी यावर मोठे भाष्य केले. तसेच पुढीलवर्षी खेळाडू आयपीएल सोडून PSL खेळातील असे देखील म्हंटले.

रमीझ राजा पीएसएलच्या पुढील हंगामात बदल घडवून आणण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या मते, पाकिस्तान सुपर लीगच्या संकल्पनेत बदल करण्याची वेळ आली आहे. आणि लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे. यामुळे पीएसएल आयपीएलच्या बरोबरीने येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पीसीबी प्रमुखांचा असा विश्वास आहे की बाजार आमच्यासाठी अनुकूल आहे, परंतु आम्हाला यासाठी फ्रेंचायझी मालकांशी चर्चा करावी लागेल. कारण हा पैशाचा खेळ आहे. जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल तेव्हा देशाचा सन्मान वाढेल. कारण त्या अर्थव्यवस्थेचे मुख्य कारण पीएसएल असेल. जर आम्ही पाकिस्तान सुपर लीगमध्ये लिलाव मॉडेल लागू केली तर आम्ही आयपीएलशी बरोबरी करू शकतो. आणि असे झाल्यास खेळाडू आयपीएल सोडून पीसीएल पसंती देतील.

हवेत बोलणाऱ्या रमीज राजा यांना आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने जमिनीवर आणले आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत आकाश चोप्रा म्हणाला, “पीसीएलमध्ये जरी तुम्ही ऑक्शन पद्धत आणलीत तरी काही फरक पडणार नाही. कारण तुम्हाला 16 कोटींचा खेळाडू झेपणार नाही. मुळात मार्केटमधील सेटअप तुम्हाला तसं करू देणार नाही. गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण पीएसएलमधील कोणत्याही खेळाडूला 16 कोटींना विकताना तुम्ही पाहिले नसेल, कारण हे शक्य नाही. IPL, BBL, The Hundred किंवा CPL यांच्याशी तुलना करणं तुमच्या दृष्टीने जरा अतिच आहे. खेळाडूंच्या किमती, फँचायजीच्या आर्थिक मर्यादा, संघांची किंमत हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि जर तुम्ही हे सगळं वेगवेगळं पाहत असाल तर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल”, असं आकाश चोप्राने म्हंटले आहे.