Train accident
Train accident

नाशिक (Nashik) जवळ भीषण रेल्वे अपघात (Train accident) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयनगर एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत. दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

डाऊन मार्गावर नाशिकजवळ लहवित आणि देवलाली दरम्यान ट्रेन क्रमांक 11061 LTT-जयनगर एक्स्प्रेस (Jayanagar Express) चे 10 डबे रुळावरून घसरले.

अपघाताची माहिती मिळताच अपघात निवारण गाडी (Prevention vehicle) आणि मेडिकल व्हॅन (Medical van) घटनास्थळी रवाना झाली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ (Bhusaval) विभागातील नाशिकजवळ मालगाडीचे 11 डबे रुळावरून घसरले.

त्याची माहिती तत्काळ प्रभावाने रेल्वेला देण्यात आली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अपघातानंतर हेल्पलाइन क्रमांक जारी केले जातात –

– CMMT-022-22694040

-CMMT- 022-67455993

-नाशिकरोड – 0253-2465816

-भुसावळ – 02582-220167

-आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 54173

या गाड्या विस्कळीत झाल्या –

  • 12617 निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस
  • 12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12188 जबलपूर गरीबरथ
  • 11071 वाराणसी एक्सप्रेस
  • 01027 LTT-गोरखपूर उन्हाळी विशेष

ही ट्रेन वळवली –

  • 22221 निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दिवा-वसई मार्गे